Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
79 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे साजरा
| Date: 2025-08-15
दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी, डॉ. राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, मलकापूर येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. हा सोहळा इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे आणि माननीय सचिव कुमारी तनवी ताई गोडे यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख आणि शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव अढाव यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. शामराव पंढरी मुके, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक, मलकापूर, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. श्री शामराव मुके सर यांनी गुन्हेगारीच्या मूळ कारणांचा उहापोह केला. त्यांनी तरुणांना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि सामाजिक जागरूकतेतून गुन्हेगारी कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.तरुणाई ही देशाची खरी शक्ती आहे, परंतु व्यसनांमुळे त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. तंबाखू, दारू आणि मादक पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना व्यसनमुक्तीच्या चळवळीत सक्रिय सहभागी होण्याचे आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला विशेष रंगत आणण्यासाठी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी तनिषा पालवे, तनिषा भन्साली, सोनम गणतीरे, निकिता निंबुळकर आणि नम्रता रायपुरे यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक नृत्य सादर केले, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help