Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
शिराढोण येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमदान शिबिराचा सहावा दिवस यशस्वीपणे पार पडला
| Date: 2026-01-10
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाने दत्तक गाव शिराढोण येथे आयोजित केलेल्या विशेष शिबिराचा सहावा दिवस मोठ्या उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडला. इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर राबविण्यात येत आहे. दिवसाची सुरुवात सकाळी डॉ. देवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी विविध योगासने करून केली. यामुळे स्वयंसेवकांना शारीरिक तंदुरुस्ती आणि एकाग्रता मिळाली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावातील पडीत जमीन आणि राम मंदिराची जागा साफसफाई करून गाव स्वच्छतेचे महत्त्वपूर्ण काम पार पाडले. या उपक्रमामुळे गावातील सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहीमला चालना मिळाली. दुपारच्या सत्रात विशेष मार्गदर्शन श्री. राजेंद्र तायडे (विस्तार अधिकारी, मोताळा) यांनी केले. त्यांनी संविधान, पंचायतराज आणि घटना दुरुस्ती या विषयावर अतिशय उपयुक्त माहिती दिली. तसेच, ते एक उत्कृष्ट कवी असल्याने त्यांच्या कवितेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्याचा सर्व स्वयंसेवकांनी खूप आनंद घेतला. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. देवकर, प्रा. अनंता तीतरे, प्रा. साक्षी पाटील तसेच सर्व उत्साही स्वयंसेवक उपस्थित होते.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help