शिराढोण येथील एनएसएस विशेष शिबिराचा चौथा दिवस यशस्वी
| Date: 2026-01-08
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने, डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाने दत्तक गाव शिराढोण येथे आयोजित विशेष शिबिराचा चौथा दिवस उत्साहात पार पडला.दिवसाची सुरुवात सकाळी मंडूकासन वज्रासन सर्वांगासन यासारखे विविध योगासने घेऊन डॉ.देवकर सर यांनी योगासने घेतली . त्यानंतर स्वयंसेवकांनी माझी कचरा माझी जबाबदारी व पडीक जमीन विकास उद्देशा अंतर्गत गावाशेजारील पडीक जमीन स्वच्छ केली व जनसेवेचे कार्य केले .दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून नीता नागरे मॅडम तलाठी कार्यालय मलकापूर यांनी महिला सशक्तिकरण या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी कोणतीही भीती न बाळगता समाजामध्ये सोहळा ने पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करून श्री शक्तीचा जागर कसा करावा याबद्दल माहिती सांगितली खऱ्या अर्थाने आज स्त्री सक्षमीकरण झाले आहे का याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे आज महिला कित्येक ठिकाणी उच्च पदावर चांगल्या रीतीने काम करत आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम केले पाहिजे. कार्यक्रमाला प्रा. वा. रा. नारखेडे सर, , डॉ. देवकर सर, प्रा. भावेश मंडवाले प्रा. अनंता तितरे,प्रा. साक्षी पाटील तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. प्राची रहाणे यांनी तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक अजिंक्य रहाणे यांनी केले. छायाचित्रण तुषार गारमोडे व प्रतीक्षा शिरसाट यांनी केले.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help