Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
शिराढोण येथील एनएसएस विशेष शिबिराचा पाचवा दिवस यशस्वी पार पडला
| Date: 2026-01-09
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाने दत्तक गाव शिराढोण येथे आयोजित केलेल्या विशेष शिबिराचा पाचवा दिवस मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला.
दिवसाची सुरुवात सकाळी डॉ. देवकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी विविध योगासने करून केली.
त्यानंतर स्वयंसेवकांनी गावातील दर्शनी भागातील पडीत जमिनीची साफसफाई करून गाव स्वच्छ करण्याचे काम केले.
दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद शाळा, शिराढोण येथे डिपार्टमेंट ऑफ फार्माकोलॉजी च्या वतीने गावकरी आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी आणि बीएमआय (BMI) तपासणी मोफत करण्यात आली.
याचबरोबर अर्णव नेत्रालय च्या डॉ. मिश्रा सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने सर्वांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून मोफत सेवा पुरवली.
दुपारी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. टाले सर (जिल्हा समन्वयक, एड्स नियंत्रण कक्ष, बुलढाणा) आणि अरुणा झाडे मॅडम यांनी एड्स नियंत्रण या विषयावर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help