News-Details

शिराढोण येथील एनएसएस विशेष शिबिराचा तिसरा दिवस यशस्वी

| Date: 2026-01-07


इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने, डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) पथकाने दत्तक गाव शिराढोण येथे आयोजित विशेष शिबिराचा तिसरा दिवस उत्साहात पार पडला.दिवसाची सुरुवात सकाळी योगासन आणि प्रार्थनेने झाली. त्यानंतर स्वयंसेवकांनी गावातील भवानी देवी मंदिर आणि शिराढोण गावाच्या प्रवेशद्वाराची स्वच्छता केली. यानंतर श्री गजानन महाराज सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित दिंडीमध्ये सहभाग घेऊन सेवेचे कार्य केले.दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथील प्राध्यापक डॉ. प्रसाद कुमार शुक्ला यांनी "पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे सामाजिक जीवन व समरसता" या विषयावर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी उपाध्यायजींच्या जीवनातील सामाजिक समरसता आणि अंत्योदयाच्या विचारांना विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.कार्यक्रमाला प्रा. वा. रा. नारखेडे सर, प्रा. क्षीरसागर मॅडम, प्रा. राणे मॅडम, प्रा. साक्षी पाटील, डॉ. देवकर सर, प्रा. अनंता तितरे तसेच सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. ऋतुजा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन स्वयंसेवक कृष्णा नीलकंठे यांनी केले. छायाचित्रण तुषार गारमोडे यांनी केले.

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help