मलकापूर फार्मसी कॉलेजमध्ये GPAT आणि सॉफ्ट स्किल्सवर प्रेरणादायी सेमिनार
| Date: 2025-11-06
डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी कॉलेजमध्ये आज करिअर मार्गदर्शन, GPAT तयारी आणि सॉफ्ट स्किल्स विकासावर सेमिनार पार पडला. प्राचार्य डॉ. पी. के. देशमुख आणि शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस. आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली, तर संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेबआणि सचिव कुमारी तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम साकारला.
लातूर जीडीसी ऑफलाइन सेंटरचे प्रमुख श्री. रुपेश चौरे यांनी विद्यार्थ्यांना GPAT, NIPER सारख्या परीक्षांसाठी स्मार्ट तयारीचे टिप्स दिले – परीक्षा पॅटर्न, मानक पुस्तके, सातत्यपूर्ण सराव आणि वेळेचे व्यवस्थापन यावर भर! त्यांनी माइंड मॅप, समस्या सोडवणे आणि आत्मविश्वास वाढवण्याचे गुरू मंत्रही शिकवले.
व्यक्तिमत्व विकासावर चर्चा झाली. "तांत्रिक ज्ञानासोबत सॉफ्ट स्किल्सशिवाय यश नाही," असा संदेश चौरे सरांनी दिला. त्यांनी कॉलेज लायब्ररीला पुस्तक संचही भेट दिला.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help