Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39

Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40

News-Details

डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात रासायनिक व जैविक कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

| Date: 2025-10-13


इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव कु. तन्वीताई गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख आणि डॉ. व्ही .एस. अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयात रासायनिक आणि जैविक कचरा विल्हेवाट व्यवस्थापन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. ही कार्यशाळा पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून डॉ. उमेश लढे (प्लांट मॅनेजर, बेंजोकेम, मलकापूर) आणि अक्षय राऊत (वाईज इको केअर अँड फार्माटेक, खामगाव) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. आशिष राठी व सहआयोजक प्रा. विकास घाईट यांनी उत्कृष्टपणे कार्यक्रमाचे आयोजन केले .
कार्यशाळेत जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर प्रथम बोलताना अक्षय राऊत यांनी वेगवेगळ्या रंगांच्या कचरा पेट्यांचा वापर कसा करावा, व्यवस्थापनादरम्यान घ्यावयाची काळजी आणि संबंधित नियम याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ. उमेश लढे यांनी मुदत संपलेल्या केमिकल्सचे व्यवस्थापन कसे करावे, त्यासाठी कोणत्या उपाययोजना आणि नियमांचे पालन करावे याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

Connect With Us

Connecting Aspirations, Engineering Excellence

Dr. Rajendra Gode College Of Pharmacy, Malkapur
EDUCATION FOR EVERYONE

Have Questions About Admissions? We’re Here to Help