Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे साहेब आणि माननीय सचिव कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय, मलकापूर येथे ‘फायनान्शियल एज्युकेशन’ या विषयावर एक विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आयक्यू एसी (IQAC) आणि विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. शशांत मिश्रा, ऑफिसर इन्चार्ज, आयएससी (ISC), नागपूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक शिक्षणाचे महत्त्व, पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पैसा कसा गुंतवायचा, बचत आणि गुंतवणुकीतील संतुलन, आर्थिक जोखीम व्यवस्थापन आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
सेमिनारला महाविद्यालयाचे प्राचार्य पी. के. देशमुख, शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. व्ही. एस. अढाव यांच्यासह प्रा. डॉ. मंगेश देवकर, प्रा. विकास घाईट आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला असून, भरपूर संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून या उपयुक्त विषयाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. अनंता तितरे यांनी उत्तम रीतीने सांभाळले. हा सेमिनार विद्यार्थ्यांच्या आर्थिक जागरूकतेसाठी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरला.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help