डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाचा युवा महोत्सवात उत्साहपूर्ण सहभाग* अमरावती
| Date: 2025-10-10
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेंद्रजी गोडे आणि सचिव कु. तन्वी गोडे यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख आणि डॉ. वैभव अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाने श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे 7 ते 10 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित युवा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेला आणि कौशल्याला व्यासपीठ मिळवून देत विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. वादविवाद स्पर्धेत चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनी कु. सुहानी खिरडकर आणि सुहानी वैद्य यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रा. साक्षी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तृतीय वर्षाच्या कु. प्रतीक्षा सुरळकर यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत चतुर्थ वर्षाच्या कु. लक्ष्मी जोहरी, मनस्वी रायबागकर आणि स्वाती काटोने यांनी आपली बुद्धिमत्ता दाखवली.
याशिवाय, पथनाट्य सादरीकरणात तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. प्रणिता वावगे, स्नेहल हागे, पूजा हागे, ऋतुजा गलांडे, प्रगती कुराडे आणि मृणाली शिरसाट यांनी सामाजिक संदेश देणारे प्रभावी नाट्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. मेहंदी स्पर्धेत कु. प्रियंका बोदुळे यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत आपली कला सादर केली.
युवा महोत्सवाचे प्रमुख प्रा. अनंता जी. तितरे आणि महिलाप्रमुख प्रा. मोहिनी शिरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले. प्रा. श्वेता राने, प्रा. भावेश मांडवले आणि प्रा. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाली, ज्यामुळे त्यांनी महोत्सवात आपली चमकदार उपस्थिती नोंदवली.
या उपक्रमाद्वारे डॉ. राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयाने शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि कलात्मक क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help