Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
| Date: 2025-09-09
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव, कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या सहकार्याने शिक्षक दिन आणि आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याकरिता महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी कार्यक्रमाचे विद्यार्थ्यां मार्फत आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिन साजरा करण्याकरिता आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत प्रात्यक्षिके घेतली व व्याख्याने दिली. महाविद्यालयामध्ये दुपारी ४.०० वाजता औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनाने करण्यात आली त्यामध्ये भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासक डॉ.वैभव आढाव व डॉ.राजू ठेंगे, डॉ.पवन चिंचोले, प्राध्यापक महेश नारखेडे प्राध्यापक राहुल दराखे, प्राध्यापिका लीना जोगे हे सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले मनोगत व्यक्त करणारी ध्वनी चित्र प्रदर्शित केले
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help