Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
| Date: 2025-08-29
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव, कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत देशमुख सर यांच्या सहकार्याने डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, जो हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त आहे. हा दिवस खेळांचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती आणि मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय योगदानाला सलाम करण्यासाठी महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला यामध्ये विविध क्रीडा उपक्रम हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो ,चेस, कॅरम व रस्सीखेच असे विविध खेळ खेळण्यात आले क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पि .के.देशमुख तसेच शैक्षणिक व्यवस्थापक व्ही .एस .अढाव सर्व शिक्षक व शिक्षकेतर तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पुरुष क्रीडा प्रकाराचे पंच म्हणून प्रा.मंगेश देवकर प्रा. भावेश मंडवाले, प्रा. वैभव पाटील तसेच महिला क्रीडा प्रकाराचे पंच म्हणून प्रा.मोहिनी क्षीरसागर प्रा. साक्षी पाटील, प्रा.किरण गायकवाड यांनी काम केले . विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा यासाठी प्रा. विशाल पडघान प्रा. विकास घाईट प्रा.किसन पवार प्रा. करण गायकवाड यांनी प्रयत्न केले .सर्व क्रीडा प्रकाराचे व्यवस्थित नियोजन प्रा. राहुल दराखे प्रा.अनंता तितरे शिक्षकेतर कर्मचारी युवराज पाटील ,गणेश जंगले व विद्यार्थी क्रीडा सचिव अविनाश इंगळे व सर्व टीम यांनी सर्वांना मिळून उत्साहात पार पाडले.
छायांकन- ओम कराळे , अमरदीप सोनवणे बी.फार्म द्वितीय वर्ष यांनी केले.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help