Warning: file_get_contents(http://ip-api.com/json/216.73.216.73): Failed to open stream: HTTP request failed! HTTP/1.1 429 Too Many Requests
in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 30
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 39
Warning: Trying to access array offset on value of type null in /home/u700859437/domains/drgcop.ac.in/public_html/includes/Private/topscript.php on line 40
डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
| Date: 2025-07-16
इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री योगेंद्रजी गोडे साहेब आणि मा. सचिव, कु. तन्वी गोडे मॅडम यांच्या प्रेरणेने तसेच माननीय प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख सर यांच्या सहकार्याने डॉ.राजेंद्र गोडे फार्मसी महाविद्यालय मलकापूर येथे दिनांक 16 जुलै 2025 रोजी "राष्ट्रीय सेवा योजना आणि औषधी वनस्पती उद्यान यांच्या वतीने "एक पेड मॉं के नाम वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्राचार्य डॉ. प्रशांत.के.देशमुख तसेच शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. वैभव. एस. अढाव, सर्व प्राध्यापक रुंद, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या स्वयंसेवकांनी तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश. एन. देवकर, सह कार्यक्रम अधिकारी प्रा.अनंता.जी. तितरे प्रा. साक्षी. एन. पाटील आणि औषधी वनस्पती उद्यानाचे प्रमुख प्रा. विकास.एन.घाईट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि हिरव्या भविष्यासाठी वृक्षारोपण मोहीम यशस्वीपणे पार पडली. एक झाड हजारो स्वप्नांचा आधार! आज लावलेली ही झाडे शुद्ध हवा, सावली आणि आरोग्यासाठी लाभदायक आहेत. झाडे लावा झाडे जगवा जीवन वाचवा! हा संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Connect With Us
Connecting Aspirations, Engineering Excellence
EDUCATION FOR EVERYONE
Have Questions About Admissions? We’re Here to Help